मनमाडमध्ये वंचिचे ‘चूल मांडो’ आंदोलन
मनमाड, 06 एप्रिल (हिं.स.)। : देशभरात निर्माण झालेल्या गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनमाड येथील तलाठी कार्यालयाच्या आवारात ‘चूल मांडो’ आंदो
Chul Mando' protest by Vanchit


मनमाड, 06 एप्रिल (हिं.स.)।

: देशभरात निर्माण झालेल्या गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनमाड येथील तलाठी कार्यालयाच्या आवारात ‘चूल मांडो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक महिलांनी थेट चूल मांडून भाकरी थापत सरकारच्या धोरणांचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला.हे नरेंद्र दे सिलिंडर आशा घोषणा देत राज्य व केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

आखाती देशात युध्द सुरू असून यामुळे गेल्या काही दिवसांपासून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. तासनतास रांगेत उभे राहूनही गॅस मिळत नसल्याने गृहिणी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे. या टंचाईचा जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनी तलाठी कार्यालयावर धडक दिली. व चूल मांडून येथेच स्वयंपाक करत राज्य व केंद्र सरकारचा निषेध नोंदवला या आंदोलकांनी हातात निषेधाचे फलक घेऊन 'हे नरेंद्र दे सिलेंडर' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. गॅस टंचाईमुळे गरिबांच्या चुली पेटणे कठीण झाले आहे. सरकारने त्वरित यावर तोडगा काढून गॅस पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा यापुढे अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आनंद शिनगारे, आंदोलक सुचिता विलास आहिरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि महिला सहभागी झाल्या होत्या.

चौकट

नरेंद्र मोदींच्या नाकर्तेपणामुळे आज आमच्यावर ही वेळ..!देशातील जनतेने मोठ्या आशेने आणि नरेंद्र मोदींच्या भोळ्या भाबड्या शब्दांवर विश्वास ठेवून विकासाच्या मुद्द्यावर त्यांना एकहाती सत्ता दिली होती मात्र गेल्या 11 वर्षांपासून देशातील गोरगरीब जनतेचा विकास मात्र झाला नाही याउलट त्यांना जगण्यासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू विकत घेण्यासाठी लायनीत उभे केले मुळात भाजप प्राणित केंद्र सरकार आणि स्वतःला विश्वगुरू म्हणवणारे नरेंद्र मोदी यांचा हा नाकर्तेपणा असुन त्यांच्या नाकर्तेपणा मुळे आमच्यावर आज ही वेळ आली आहे.भविष्यात याहीपेक्षा वाईट अवस्था होईल जनतेने आता यांना धडा शिकवला पाहिजेआनंद शिनगारे, जिल्हा नेते वंचीत बहुजन आघाडी

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande