कोल्हापूर मनपातील जनता दरबारात अतिक्रमणे, अधिकाऱ्यांची मनमानी, भूपाल शेटे यांच्यावर आरोप
कोल्हापूर, 06 एप्रिल (हिं.स.)।कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम यांनी महापौर पदाची धुरा हाती घेतल्यानंतर ''आपले शहर आपली जबाबदारी'' हा उपक्रम सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जनता दरबारही उपक्रम सुरू केला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आवार
कोल्हापूर महानगरपालिकेत दुसरा जनता दरबार


कोल्हापूर, 06 एप्रिल (हिं.स.)।कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम यांनी महापौर पदाची धुरा हाती घेतल्यानंतर 'आपले शहर आपली जबाबदारी' हा उपक्रम सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जनता दरबारही उपक्रम सुरू केला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आवारात दुसरा जनता दरबार घेण्यात आला. या जनता दरबार मध्ये अनेक नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. याबरोबरच कोल्हापूर शहरातील वाढते फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि माजी नगरसेवक भूपाल शेटे यांची बेकायदेशीर अतिक्रमणे याबाबत ही चर्चा झाली. यावर महापौर निकम यांनी कोल्हापूर शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी लवकरच मोहीम हाती घेणार असल्याचे जाहीर केले.

महापौर रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दुसऱ्या जनता दरबार मध्ये नागरिकांनी समस्या मांडण्यासाठी गर्दी केली होती. त्याची नोंदणी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना आज प्रशासनातील अधिकाऱ्यांचा उलटा अनुभव आला. याबाबत ही काही नागरिकांनी या जनता दरबार मध्येच आपल्या व्यथा मांडल्या. महानगरपालिकेतील अधिकारी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न ऐकून घेत नाहीत.तसेच कामासाठी आलेल्या नागरिकांची दखल घेत नाहीत अशी तक्रार नागरिकांनी केली. यामध्ये जाणीवपूर्वक नागरिकांच्या कडे दुर्लक्ष केले जाते. अधिकारी नोंदणी करत असताना मोबाईलवर चॅटिंग करण्यात व्यस्त होते. अधिकारी स्वतः आपल्या गळ्यात ओळखपत्र घालत नाहीत त्यामुळे कोण कर्मचारी? कोण अधिकारी? कोण काय करते हे सांगता येत नाही त्यामुळे प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी महापालिकेत का ड्युटीवर असताना ओळखपत्र गळ्यात घातलेच पाहिजे अशी मागणी केली.

जनता दरबार चालू असतानाच काही अधिकाऱ्यांनी कर्मचारी यांनी गळ्यात ओळखपत्र नव्हते. त्याची तपासणीही करून काही अधिकाऱ्यांना महापौर निकम यांनी चांगलेच झापले. जनता दरबार मध्ये शहरातील फेरीवाल्यांचे रहदारीला अडथळा होईल असे वाढणारे अतिक्रमण तसेच रंकाळा चौपाटीवर अचानक तब्बल 17 व्यावसायिक टपऱ्या मांडून अतिक्रमण करण्याचा झालेला प्रयत्न याबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर महापौर निकम यांनी त्या टपऱ्यांचे अतिक्रमण काढून टाकण्यात आले असून इतरही सर्व शहरातील फेरीवाल्यांची अतिक्रमणे लवकरच काढण्यात येतील असे सांगितले. ज्यांची अतिक्रमणे आहेत ती स्वतःहून काढून घ्यावी असे आवाहन केले. याबाबत पंधरा दिवसानंतर मोहीम अधिक तीव्र करणार असल्याचे सांगितले. माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी महापालिकेत पदावर असताना अनेक बेकायदेशीर कामे स्वार्थासाठी करून घेतली असल्याचे एका नागरिकांने तक्रार केली. याबाबत काही उदाहरणे ही त्यांनी दिली. आणि या सर्व अतिक्रमणावर व बेकायदेशीर कामावर कारवाई करावी अशी मागणी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande