
- शिक्षण समिती सभापती पदी अभिजीत थरवळ, तर महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती पदी सारिका जाधव
डोंबिवली, 06 एप्रिल (हिं.स.) - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेना-भाजपा महायुतीचे मल्लेश शिवन्ना शेट्टी, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण समितीच्या सभापती पदासाठी शिवसेना-भाजपा महायुतीचे अभिजीत सुजाता सदानंद थरवळ आणि महिला व बाल कल्याण, दिव्यांग कल्याण, नागरी दलित वस्ती आणि झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या सभापती पदासाठी शिवसेना-भाजपा महायुतीच्या सारिका सतीश जाधव या उमेदवारांनी दि.02 एप्रिल 2026 रोजी आपली नामनिर्देशन पत्रे महापालिका सचिव किशोर शेळके यांचेकडे दाखल केली होती. या तीनही समितींच्या सभापती पदासाठी केवळ एक-एकच नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने सोमवारी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या विशेष सभेमध्ये मल्लेश शिवन्न शेट्टी (स्थायी समिती सभापती), अभिजीत सुजाता सदानंद थरवळ (शिक्षण समिती सभापती) आणि सारिका सतीश जाधव (महिला व बाल कल्याण समिती सभापती) म्हणून घोषित करण्यात आले.
यावेळी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, महापालिका सचिव बाळासाहेब चव्हाण, संबंधित समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी आमदार राजेश मोरे, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, महापौर हर्षाली चौधरी, उप महापौर राहुल दामले, महापालिका पदाधिकारी, इतर मान्यवर तसेच पालिका सदस्यांनी नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन केले.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi