
छत्रपती संभाजीनगर, 06 एप्रिल (हिं.स.)रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा आढावा दौऱ्यादरम्यान पैठण तालुक्यातील ताहेरपूर-बिडकीन येथे फलोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देत फळबागांची पाहणी केली.आंबा, पेरू व डाळिंब यांसह विविध फळपिकांची अद्यावत पद्धतीने लागवड करून शेतकरी चांगले उत्पन्न घेत असल्याचे त्यांनी पाहिले. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत लागवडीतील अडचणी व शासनाकडील अपेक्षा जाणून घेतल्या. विशेष म्हणजे, मंत्री गोगावले यांनी बैलगाडीत बसून शेतात फेरफटका मारत प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis