जळगावात भाविकांची पिकअप व्हॅन उलटून ११ जण जखमी
जळगाव, 06 एप्रिल (हिं.स.) अमळनेर तालुक्यातील जैतपिर गावाजवळ भीषण अपघाताची घटना समोर आलीय. नवसासाठी जात असलेल्या भाविकांची पिकअप व्हॅन उलटून ११ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींपैकी ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे य
अपघात लोगो


जळगाव, 06 एप्रिल (हिं.स.) अमळनेर तालुक्यातील जैतपिर गावाजवळ भीषण अपघाताची घटना समोर आलीय. नवसासाठी जात असलेल्या भाविकांची पिकअप व्हॅन उलटून ११ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींपैकी ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले आहे. अपघाताची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, शिंदखेडा तालुक्यातील वैजापूर येथील २० ते २५ भाविक एका पिकअप व्हॅनने नवस फेडण्यासाठी जात होते. अमळनेरच्या जैतपीर येथील वळणाजवळ असलेल्या गतिरोधकाजवळ समोरून अचानक ट्रक आल्याने व्हॅनवरील चालकाचे नियंत्रण सुटले. परिणामी, पिकअप व्हॅन उलटून सर्व प्रवासी खाली कोसळले. अपघातानंतर वाहन पलटी होताच त्यातील अनेक जण हे रस्त्यावर फेकले गेले. त्यामुळे अनेक प्रवाशांना दुखापती झाल्या आहेत. दरम्यान, या अपघाताचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे. या फुटेजमध्ये पिकअप वाहन अचानक पलटी होताना आणि त्यातील प्रवासी बाहेर फेकले जाताना स्पष्ट दिसत आहे. या दृश्यांमुळे अपघाताची भीषणता अधिक स्पष्ट झाली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना तातडीने मदत पुरवण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या सहा जणांना धुळे येथे रवाना करण्यात आले आहे. अंकुश भगवान बागुल (२०), राकेश प्रकाश मोरे (२०), बादल गुलाब भिल (१९), संजय बापू मोरे (२२), गणेश ताराचंद भिल (२१) – सर्व रा. वैजापूर आणि मेलसिंग जयसिंग कुवर (२२). या तरुणांच्या हात, पाय, पाठ आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर विजय दिलीप पवार (२२), राकेश सुखराम भिल (२३), रोहित भिल (१८) तिन्ही रा. वैजापूर, नागेश मंगल भिल (२०, रा. जोयदा, ता. शिरपूर) आणि सनी श्याम भिल (१८, रा. माळीच, ता. शिरपूर) हे अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande