
मुंबई, 06 एप्रिल (हिं.स.) - कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन (सीपीए) इंडिया रिजन, झोन-VII (वेस्ट झोन) परिषद ८ ते १० एप्रिल २०२६ या कालावधीत पणजी, गोवा येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत, विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे सहभागी होणार आहेत.
या परिषदेत, ‘झोन-VII मधील व्यापार, पर्यटन, शहरीकरण, पर्यावरण आणि किनारपट्टी जोडणी या क्षेत्रातील प्राधान्यक्रम’ या विषयावर परिसंवाद होणार आहे.
या कार्यक्रमाला, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभा उपसभापती हरिवंश नारायण सिंह, गोवा राज्यपाल अशोक गजपती राजू, गोवा राज्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा विधानसभा अध्यक्ष डॉ. गणेश गांवकर, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे ऊपसभापती मा. नीलम गोर्हे , उपाध्यक्ष मा .अण्णा बनसोडें आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच काही मान्यवर आमदारही येणार आहेत.
सीपीए इंडिया रिजन अंतर्गत झोन-VII मध्ये गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या विधानसभांचा समावेश आहे. पणजीत होणाऱ्या तीन दिवसीय परिषदेमुळे पश्चिम झोनमधील संसदीय सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी