नागपूर परिमंडलात एक वर्षात 66,422 नवीन लघुदाब वीज जोडण्या
‘इज ऑफ लिव्हिंग’ अंतर्गत महावितरणच्या ग्राहकांना तातडीने सेवा नागपूर, ६ एप्रिल (हिं.स.) : केंद्राच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ निर्देशांकानुसार महावितरणच्या नागपूर परिमंडलाने १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत एकूण ६६,४२२ लघुदाब ग्राहकांना नवीन वी
संग्रहित छायाचित्र


‘इज ऑफ लिव्हिंग’ अंतर्गत महावितरणच्या ग्राहकांना तातडीने सेवा

नागपूर, ६ एप्रिल (हिं.स.) : केंद्राच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ निर्देशांकानुसार महावितरणच्या नागपूर परिमंडलाने १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत एकूण ६६,४२२ लघुदाब ग्राहकांना नवीन वीज जोडण्या दिल्या आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृत्वात ग्राहकांना तातडीने वीज सेवा पुरवण्यात येत आहेत.

विभागानुसार वितरण:

नागपूर जिल्हा:- ५६,८९२ नवीन वीज जोडण्या

काँग्रेसनगर – ११,८०१

मौदा – ८,५९७

बुटीबोरी – ७,४८२

महाल – ७,२६२

सिव्हील लाईन्स – ७,०२३

गांधीबाग – ५,१९८

सावनेर – ३,९४२

उमरेड – ३,३३९

काटोल – २,२४८

वर्धा जिल्हा :- ९,५३० नवीन वीज जोडण्या

वर्धा – ४,६०५

हिंगणघाट – २,६४१

आर्वी – २,२४१

वीज जोडण्यांचा प्रकार:

घरगुती – ५३,१३७

नागपूर शहर – ३१,३४१

नागपूर ग्रामीण – १४,८४०

वर्धा – ६,९५८

वाणिज्यीक – ९,६३५

औद्योगिक – १,२०३

इतर – २,४४७

महावितरणने ‘इज ऑफ लिव्हिंग’ अंतर्गत नवीन वीज जोडणीसाठी तात्काळ सेवा सुरू केली आहे. ग्राहकांनी नवीन वीज जोडण्या घेतल्यानंतर त्यांच्या वीज बिलांचे ऑनलाइन भरणे नियमित करण्याचे आवाहनही महावितरणने केले आहे.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande