नागपूर : बुटीबोरीत 10 एप्रिलपासून पीएनजी कनेक्शन
आगामी 8 वर्षात जिल्हाभरात देणार घरपोच गॅस जोडणी नागपूर, 06 एप्रिल (हिं.स.) : पश्चिम आशियातील युद्धामुळे गॅस तुटवडा निर्माण झालाय. तर तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर देशात गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरू आहे. यावर उपाय म्हणून सरकारने घरगुती ‘पाईप्ड नॅचरल ग
पीएनजी जोडणी लोगो


आगामी 8 वर्षात जिल्हाभरात देणार घरपोच गॅस जोडणी

नागपूर, 06 एप्रिल (हिं.स.) : पश्चिम आशियातील युद्धामुळे गॅस तुटवडा निर्माण झालाय. तर तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर देशात गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरू आहे. यावर उपाय म्हणून सरकारने घरगुती ‘पाईप्ड नॅचरल गॅस’चा (पीएनजी) पुरवठा करण्याचा निश्चय केला. त्याचाच एक भाग म्हणून नागपूरच्या बुटीबोरी औद्यौगिक परिसरात आगामी 10 एप्रिलपासून अधिकृत पीएनजी पुरवठ्याला सुरूवात होणार असल्याचे हरियाणा सिटी गॅस कंपनीचे अध्यक्ष दीपक सावंत यांनी सांगितले.

याबाबत सावंत यांनी सांगितले की, या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात बुटीबोरी परिसरातील 100 कुटुंबांना थेट पाइपलाइनद्वारे गॅस कनेक्शन दिले जाणार असून, नागपूर जिल्ह्यातील ही पहिलीच अशी सुविधा ठरणार आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हरियाणी सिटी गॅस (एचसीजी) कंपनीकडून राबविण्यात येत आहे. गॅस पुरवठ्यासाठी गेल यांच्या मुंबई-नागपूर मुख्य पाइपलाईनचा वापर केला जाणार आहे.सध्या बुटीबोरीपर्यंत सुमारे 30 किलोमीटर लांबीची पाइपलाईन टाकण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात निवडक निवासी संकुलांना कनेक्शन देण्यात येणार आहे.

देशात एलपीजी गॅसच्या टंचाईमुळे निर्माण झालेल्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर पीएनजी हा पर्याय नागपूरकरांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. पीएनजी गॅस एलपीजीच्या तुलनेत 20 ते 30 टक्के स्वस्त असून अधिक सुरक्षित असतो. तसेच 24x7 अखंड गॅसचा पुरवठा होईल. विशेष म्हणजे या गॅससाठी बुडिंग आणि डिलीव्हरीची गरज भासणार नाही. बुटीबोरीपाठोपाठ नागपूरच्या जामठा, मिहान, हिंगणा, वानाडोंगरी आणि वाडी परिसरात टप्प्या-टप्प्याने या प्रकल्पाचा विस्तार केला जाणार असल्याचे दीपक सावंत यांनी स्पष्ट केले.

यानंतर शहराच्या बेसा, बेलतरोडी, मनीषनगर आणि उज्ज्वलनगर भागांपर्यंत याचा विस्तार केला जाणार आहे. आगामी 8 वर्षात संपूर्ण नागपूर जिल्ह्यात पीएनजी नेटवर्क उभारण्याचा मानस आहे. पीएनजी जोडणीसाठी प्रित कनेक्शन 9500 रुपयांचा खर्च अपेक्षित असून हे पैसे हप्त्याने भरण्याची सुविधी आहे. पीएनजीच्या माध्यमातून सुरक्षित, स्वस्त आणि अखंडित गॅस पुरवठ्यामुळे भविष्यात नागपूर “सिलेंडरमुक्त शहर” बनण्याची शक्यता आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande