
छत्रपती संभाजीनगर, 06 एप्रिल (हिं.स.)। भाजप विभागीय कार्यालयात विद्यार्थी आघाडीतील युवकांनी भाजप युवा मोर्चा (भारतीय जनता पक्षात) जाहीर प्रवेश केला. भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश पार पडला.
यावेळी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राहुल दांडगे, भाजप सरचिटणीस हर्षवर्धन कराड, सरचिटणीस छायाताई खाजेकर यांची उपस्थिती होती.
सुमित पवार (महामंत्री तथा मुख्य समन्वयक, विद्यार्थी आघाडी), गौरव जाटवे (शहराध्यक्ष, पश्चिम विद्यार्थी आघाडी) आणि अनिरुद्ध ढवळे (शहर जिल्हा उपाध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना युवा सेनेमधील (उबाठा गट) युवा कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
यावेळी सर्व युवकांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. युवकांच्या या प्रवेशामुळे पक्ष संघटनाला अधिक बळ मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis