लातूरमधील निलंगा येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान कार्यशाळा संपन्न
लातूर, 06 एप्रिल (हिं.स.)सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अधिक सक्षम आणि सजग बनविण्यासाठी भाजपा परिवाराच्या वतीने देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान’ अंतर्गत निलंगा विधानसभा मतदारसंघाची निवासी प्रशिक्षण कार्यशाळा
निलंगा


लातूर, 06 एप्रिल (हिं.स.)सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अधिक सक्षम आणि सजग बनविण्यासाठी भाजपा परिवाराच्या वतीने देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान’ अंतर्गत निलंगा विधानसभा मतदारसंघाची निवासी प्रशिक्षण कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी उपस्थित राहून सर्व कार्यकर्ता बांधवांशी संवाद साधला.

कार्यकर्ता हाच भाजपाचा आत्मा आहे. आज पक्षाने जे काही यश मिळवले आहे, ते केवळ आणि केवळ कार्यकर्त्यांच्या बळावर मिळवले आहे. त्यामुळे येथे सर्वसामान्य कार्यकर्त्याला मान आहे, सन्मान आहे आणि त्यांना सर्वोच्च पदी जाण्याची संधी देखील आहे. केवळ निवडणुकीपुरता कार्यकर्त्याचा विचार न करता, त्याला एक सक्षम नागरिक बनविण्यासाठी पक्ष कायम प्रयत्नशील असून, हे अभियान त्याचेच प्रतीक आहे. त्यामुळे हे प्रशिक्षण तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवून सर्व कार्यकर्त्यांना सक्षम करण्याचा निर्धार करूया, अशी भावना यावेळी आमदार निलंगेकर यांनी व्यक्त केली.

याचबरोबर, यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या फलकांचे अनावरण देखील करण्यात आले. राष्ट्रीय जलजीवन मिशन, विविध केंद्र व राज्य सरकारच्या योजना तसेच अर्थसंकल्प २०२६-२७ मधील महत्त्वपूर्ण तरतुदींची माहिती देणारे हे फलक कार्यकर्ते व नागरिकांपर्यंत सरकारच्या कार्याची माहिती प्रभावीपणे पोहोचवतील.

यावेळी जिल्हा सरचिटणीस संजयजी दोरवे, निलंगा तालुकाध्यक्ष कुमोदजी लोभे, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष माधवजी बिरादार, देवणी तालुकाध्यक्ष शिवराजजी बिरादार, निलंगा बाजार समितीचे सभापती शिवकुमारजी चिंचनसुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande