पुणे विद्यापीठाच्या मराठी भाषा भवनामध्ये भटके विमुक्त अभ्यास केंद्राचे उदघाटन
पुणे, 06 एप्रिल (हिं.स.) - उज्ज्वल परंपरा समजून घेण्यासाठी अध्यासन व अभ्यास केंद्राची निर्मिती होणे आणि त्यातून समाजाचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवले जावेत हीच अपेक्षा ठेऊन विद्यापीठ काम करत आहे, असे प्र. कुलगुरू प्रा. पराग काळकर यांनी सांगितले. साव
University Pune SPUU


पुणे, 06 एप्रिल (हिं.स.) - उज्ज्वल परंपरा समजून घेण्यासाठी अध्यासन व अभ्यास केंद्राची निर्मिती होणे आणि त्यातून समाजाचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवले जावेत हीच अपेक्षा ठेऊन विद्यापीठ काम करत आहे, असे प्र. कुलगुरू प्रा. पराग काळकर यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मराठी भाषा भवनामध्ये भटके विमुक्त अभ्यास केंद्राचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळी काळकर बाेलत होते. तर प्रमुख पाहुणे उद्धव काळे यांनी भटके विमुक्त यांचा गौरवशाली इतिहास समजून सांगितला.

सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मराठी भाषा भवनामध्ये प्र. कुलगुरू प्रा. पराग काळकर व श्री. उद्धव काळे यांच्या हस्ते या भटके विमुक्त अभ्यास केंद्राचे उदघाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पराग काळकर म्हणाले, उज्ज्वल परंपरा समजून घेण्यासाठी अध्यासन व अभ्यास केंद्राची निर्मिती होणे आणि त्यातून समाजाचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवले जावेत हीच अपेक्षा ठेऊन विद्यापीठ काम करत आहे. तर प्रमुख पाहुणे उद्धव काळे यांनी भटके विमुक्त यांचा गौरवशाली इतिहास समजून सांगितला. सध्या शासन भटके विमुक्तांसाठी काम करत असल्याबद्दल आभार व्यक्त केले.

या प्रसंगी शिक्षण शास्त्र प्रशाला व शिक्षण शास्त्र विभाग संचालक डॉ. विलास आढाव यांनी या अभ्यासकेंद्राचे महत्व समजून सांगून , तीन अभ्यासकेंद्राचा त्रिवेणी संगमाचा उल्लेख केला.

या कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण शास्त्र प्रशाला व शिक्षण शास्त्र विभाग यांनी केले. डॉ. विलास आढाव , डॉ . गीता शिंदे , डॉ. नितीन आडे , डॉ. गणेश ढवळे, श्री. कृष्णाजी भांडलकर (अधिसभा सदस्य) , श्री शंतनू लामधाडे(अधिसभा सदस्य) यांनी कार्यक्रम आयोजनात सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून रवी शिंगणापुरकर , व्यवस्थापन परीषद सदस्य, प्रा संदीप पालवे, व्यवस्थापन परीषद सदस्य , सुनील भांडगे, डॉ. डी. बी. पवार व्यवस्थापन परीषद सदस्य हे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande