नवीन एक्सप्रेस ; जळगावसह भुसावळ, चाळीसगावला थांबा
जळगाव , 06 एप्रिल (हिं.स.)सध्या उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते धनबाद दरम्यान नवीन साप्ताहिक एक्सप्रेस गाडी सुरू करण्याची घोषणा केली आहे. विशेष या गाडीला
रेल्वे लोगो


जळगाव , 06 एप्रिल (हिं.स.)सध्या उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते धनबाद दरम्यान नवीन साप्ताहिक एक्सप्रेस गाडी सुरू करण्याची घोषणा केली आहे. विशेष या गाडीला जळगाव, भुसावळ आणि चाळीसगाव येथे थांबा असल्याने खान्देशातील प्रवाशांना झारखंड आणि मध्य प्रदेशातील शहरांकडे जाण्यासाठी आता थेट आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला आहे.क्र. १३३७९ धनबाद येथून आज ६ एप्रिल २०२६ पासून दर सोमवारी रात्री २३ वाजता सुटून ती भुसावळ रेल्वे स्थानकावर तिसऱ्या सकाळी ५.५५ वाजेला, तर जळगावला ६.२८ वाजेला आणि चाळीसगावला सकाळी ७.३८ वाजेला पोहोचले. यांनतर ती दुपारी १३:४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे.तर गाडी क्रमांक १३३८० लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ८ एप्रिल २०२६ पासून दर बुधवारी सायंकाळी १६:५५ वाजता सुटेल. यांनतर त्याच दिवशी चाळीसगावला रात्री १०.५४ वाजेला तर जळगावला ११.५० आणि भुसावळला रात्री १२.३० वाजेला पोहोचेल. यांनतर ती तिसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता धनबाद येथे पोहोचेल.या एक्सप्रेसला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी साऊथ, सिंगरौळी, ओबरा डॅम, रेनुकूट, डाल्टनगंज, रांची रोड, चंद्रपुरा आणि कत्रासगढ या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे भुसावळसह खान्देशातील प्रवाशांना या गाडीचा थेट लाभ मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande