
रत्नागिरी, 6 एप्रिल, (हिं. स.) : राजापूरमधील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या शासकीय विश्रामगृहाच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन आमदार किरण सामंत यांच्या हस्ते आज झाले.जुन्या शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे अलीकडेच नूतनीकरण करण्यात आले असून, या ठिकाणी आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे अद्ययावत सूट, कॉन्फरन्स हॉल तसेच बैठक व्यवस्था उभारण्यात आली आहे. त्यामुळे आता या ठिकाणी विविध शासकीय बैठका व अधिकाऱ्यांचे कार्यक्रम आयोजित करणे सुलभ होणार आहे.उद्घाटन सोहळ्याला सभापती नंदिनी कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, पोलीस निरीक्षक अमित यादव, नायब तहसीलदार विलास सरफरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. कांबळे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता संतोष भालेकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता प्रशांत पोवार, आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी