रत्नागिरी : राजापूरचा पाणीपुरवठा आता शनिवारीही बंद राहणार
रत्नागिरी, 6 एप्रिल, (हिं. स.) : राजापूर शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे तसेच वीजपुरवठ्यातील अडचणींमुळे राजापूर शहरातील पाणीपुरवठ्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे. याबाबत राजापूर नगरपरिषदेतर्फे नागरिकांना सूचना देण्
रत्नागिरी : राजापूरचा पाणीपुरवठा आता शनिवारीही बंद राहणार


रत्नागिरी, 6 एप्रिल, (हिं. स.) : राजापूर शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे तसेच वीजपुरवठ्यातील अडचणींमुळे राजापूर शहरातील पाणीपुरवठ्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे. याबाबत राजापूर नगरपरिषदेतर्फे नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार यापुढे सोमवारबरोबरच दर शनिवारीही पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

राजापूरला शीळ येथील जॅकवेलमधून पाणीपुरवठा केला जातो. मात्र महावितरणकडून होत असलेल्या भारनियमनामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून त्यामुळे पाणीसाठवण टाक्या पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. परिणामी शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असून पाणीपुरवठ्याच्या वेळाही अनियमित राहू शकतात.उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नळजोडणीवर पंप लावू नयेत, अन्यथा संबंधित नळजोडणी कायमस्वरूपी बंद करण्यात येईल, असा इशाराही पालिकेकडून देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande