अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी सत्यम गांधी रुजू
अमरावती, 06 एप्रिल (हिं.स.)। अमरावती जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सत्यम गांधी (IAS) यांनी आज आपला पदभार अधिकृतपणे स्वीकारला. प्रशासकीय फेरबदल आणि अदलाबदल राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकत्याच केलेल्या सनदी अ
अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी सत्यम गांधी रुजू; संजीता महापात्र यांची सांगली मनपा आयुक्त पदी बदली


अमरावती, 06 एप्रिल (हिं.स.)।

अमरावती जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सत्यम गांधी (IAS) यांनी आज आपला पदभार अधिकृतपणे स्वीकारला. प्रशासकीय फेरबदल आणि अदलाबदल राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकत्याच केलेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अमरावती आणि सांगली या दोन शहरांमध्ये परस्पर बदली झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सत्यम गांधी हे अमरावती जिल्हा परिषदेत रुजू होण्यापूर्वी ते सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात सांगलीतील नागरी समस्या आणि प्रशासकीय शिस्तीवर त्यांनी विशेष भर दिला होता.

संजीता महापात्र अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यक्षम कामगिरी केल्यानंतर आता त्यांची नियुक्ती सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्त पदी करण्यात आली आहे.पदभार स्वीकारल्यानंतरचे पहिले पाऊल पदभार स्वीकारल्यानंतर सत्यम गांधी यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभाग प्रमुखांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या लोकोपयोगी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आपला मानस व्यक्त केला. ग्रामीण भागाचा विकास, शिक्षण आणि आरोग्य या विषयांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर मावळत्या अधिकारी संजीता महापात्र यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande