नांदेड : 8 एप्रिलला दुसऱ्या विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन
नांदेड, 06 एप्रिल (हिं.स.)। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत अभियान स्वरूपात राबविण्यात येणाऱ्या ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान” बाबत कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने एप्रिल 2026 मध्ये चार विशेष डिजिटल शेती शाळा घेण्यात येणार आहेत. या
नांदेड : 8 एप्रिलला दुसऱ्या विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन


नांदेड, 06 एप्रिल (हिं.स.)। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत अभियान स्वरूपात राबविण्यात येणाऱ्या ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान” बाबत कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने एप्रिल 2026 मध्ये चार विशेष डिजिटल शेती शाळा घेण्यात येणार आहेत. यामध्ये पहिली डिजिटल शेतीशाळा संपन्न झाली असून दुसरी डिजिटल शेतीशाळा बुधवार 8 एप्रिल रोजी आयोजित केली असून, या डिजिटल शेती शाळांमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा. तसेच प्रत्येक गावातील शेतक-यांनी डिजिटल शेतीशाळेसाठी आपल्या घरातून ऑनलाईन उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

पाणी फाउंडेशन द्वारे संचलित डिजिटल शेती शाळा हे एक ऑनलाईन व्यासपीठ आहे. जिथे तज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त आणि पीक निहाय उत्तम पद्धतींचे मार्गदर्शन झूम आणि युट्युबच्या माध्यमातून दिले जाते.

सत्र भाग 2 मध्ये जैविक/नैसर्गिक निविष्ठा उत्पादन- बीजामृत, जीवामृत, घन जीवामृत, लींबोळी अर्क, दशपर्णी अर्क उत्पादन बाबत नियोजित बुधवार ८ एप्रिल २०२६ रोजी मार्गदर्शन मिळणार आहे. या सत्रात शेतकऱ्यांना घरच्या घरी विविध उपयुक्त निविष्ठा तयार करण्याचे प्रगत तंत्रज्ञान शिकायला मिळेल जसे की, बिजामृत, जिवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क. तसेच, या निविष्ठांचे फायदे आणि त्यांचा योग्य वापर कसा करावा याबाबत सखोल मार्गदर्शन दिले जाईल.

तरी शेतकरी बंधू-भगिनी, शेतकरी गट, FPOs आणि महिला बचत गटांनी या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. चला, तर मग हवामान बदलाला सामोरे जात, आपल्या शेतीला अधिक शाश्वत आणि समृद्ध बनवूया!

सदरील शेतीशाळेस कृषि विभाग अंतर्गत उप कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, समूह सहाय्यक, कृषी ताई व कृषी सखी तसेच पशुसंवर्धन विभाग अंतर्गत पशुसंवर्धन विकास अधिकारी, पशुसंवर्धन पर्यवेक्षक व पशुसखी हे उपस्थित राहतील. तसेच प्रत्येक गावात एका मध्यवर्ती ठिकाणी शेतकरी एकत्रित उपस्थित राहतील असे नियोजित आहे.

शेती शाळा नियोजित दिनांक दिवशी सायंकाळी ७.३० वाजता सुरू करण्यात येणार आहेत. तसेच सदर डिजिटल शेतीशाळा खाली दिलेल्या यु ट्यूब चॅनेल द्वारे आपण डिजिटल शेती शाळा बघू शकता-

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प- https://www.youtube.com/live/mEgTBeO_yP8?si=0M2ezKHv6OmCUOWf

कृषी विभाग महाराष्ट्र शासन- https://www.youtube.com/live/2JKciiYL0I?si=l21CrYi7oyDEk3Xu

पाणी फाउंडेशन- https://www.youtube.com/live/nF-20hUunAo?si=iE-MYbPJ21SCCWiH

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande