
परभणी, 06 एप्रिल (हिं.स.)।
परभणी महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी निवड झाल्यानंतर सय्यद समी ऊर्फ माजू लाला यांनी आज, सोमवारी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यावेळी महापौर सय्यद इकबाल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित नगरसेवक व मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास समाजसेवक अब्दुल सय्यद कादर, नगरसेवक दिलीप ठाकूर, राजेश रणखांबे, अतुल सरोदे, डॉ. अनिल कांबळे, संतोष गुजर, अमोल जाधव, शरफोद्दीन सिद्दीकी, अलीम काजी, रईस दादा, अलीम कुरेशी, विकास राजापुरे यांच्यासह सज्जुलाला मित्र मंडळाचे मुस्ताक सेट, समीर पोलाट, मोहम्मद आदनान, मोहम्मद सुफियान, सय्यद खिजर आदींची उपस्थिती होती. पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना सय्यद समी ऊर्फ माजू लाला यांनी सर्वांचे आभार मानले. परभणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis