पंचवटीतील 7 एकरातील वृक्ष बहरली ! मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी व वृक्ष लागवड
नाशिक, 06 एप्रिल (हिं.स.)। - नाशिक शहरामध्ये आपले नाशिक हरित नाशिक या मोहीम अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात पंचवटी परिसरात ७ एकर परिसरामध्ये सुमारे २ हजार वृक्ष लागवड करून नंदनवन फुलले आहे. या ७ एकरातील बसरलेल्या वृक्षांची पाहणी कुंभमेळा मंत्री गिरी
Trees in 7 acres of Panchavati


नाशिक, 06 एप्रिल (हिं.स.)।

- नाशिक शहरामध्ये आपले नाशिक हरित नाशिक या मोहीम अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात पंचवटी परिसरात ७ एकर परिसरामध्ये सुमारे २ हजार वृक्ष लागवड करून नंदनवन फुलले आहे. या ७ एकरातील बसरलेल्या वृक्षांची पाहणी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज रोजी केली.एन.आय.टी. महाविद्यालयाने नाशिक महापालिकेची जागेची स्वच्छता मोहीम राबवून वृक्ष लागवडीसाठी जागा तयार करून घेतली आहे. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी या कामी पुढाकार घेऊन वृक्ष लागवड संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे. कुंभमेळा मंत्री श्री गिरीश महाजन यांनी आज भेट देऊन वृक्षांची पाहणी केली आहे.

नाशिक शहरामध्ये 15,000 वृक्ष लागवडीचा संकल्प केला असल्याचे यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगून लागवड केलेले शंभर टक्के वृक्ष हे जगले आहेत. नाशिक शहरात ठीक ठिकाणी लावण्यात आलेल्या वृक्षांची योग्य ती निगा राखण्यात येत आहे त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहेत त्यामुळे सर्वच झाडे व्यवस्थित वाढतील, व जगतील.येणाऱ्या काळात देखील नाशिक शहरांमध्ये ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात येईल, वा हरित नाशिक संकल्प साकार केला जाईल असेही शेवटी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी महापौर हिमगौरीताई आडके, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,महापालिका आयुक्त मनीषा खत्री, सुरेश आण्णाजी पाटील, निलेश बोरा, नगरसेवक धनंजय माने,बापू पिंगळे, स्वप्नील नन्नावरे , नगरसेविका जुई शिंदे, आदी जण यावेळी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande