
छत्रपती संभाजीनगर, 06 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना वाळूज येथे आयोजित 'शिव-फुले-जय भीम फेस्टिवल' या महोत्सवाला फलोत्पादन मंत्री भरत गोगावले उपस्थित होते. महामानवांचे विचार घराघरात पोहोचवणारा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी सादर केलेल्या भीमगीतांच्या माध्यमातून संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध झालं होतं.
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगत की, माझे तीन गुरु आहेत. भगवान गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतिराव फुले. याच गुरु- शिष्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्यात त्यांच्या कार्याला अभिवादन केले.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि शिवसेनेचे कुंदन भाऊ लाटे यांचे अभिनंदन करत, परभणीच्या जिंतूरमधून येऊन त्यांनी संभाजीनगरमध्ये समाजकार्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी अधिकृतपणे शिवसेना पक्षात प्रवेश करून आमच्यासोबत समतेचा विचार पुढे नेण्याचा संकल्प केला आहे. अशी भावना व्यक्त करत, या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी त्यांचे कौतुक केले.
यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, आमदार प्रदीपजी जैस्वाल, आमदार विलास बापू भुमरे, खासदार संदिपान भुमरे, अतुल सावे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis