डॉ.हुलगेश चलवादी यांची 'आरपीआय' प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती
पुणे, 06 एप्रिल (हिं.स.)रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आ) राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.ना.रामदास आठवलेंनी पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी बहुजन नेते, पुण्याचे माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांची नियुक्ती केली. संघटनात्म
sdfgdf


पुणे, 06 एप्रिल (हिं.स.)रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आ) राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.ना.रामदास आठवलेंनी पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी बहुजन नेते, पुण्याचे माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांची नियुक्ती केली. संघटनात्मक कौशल्य, सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात असलेला दांडगा अनुभव तसेच लोकसंपर्क आणि बहुजन चळवळीतील सक्रिय सहभाग लक्षात घेत मा.आठवले साहेबांनी ही जबाबदारी डॉ.चलवादी यांच्या खांद्यावर टाकली आहे.

'रेसिडेन्सी क्लब' येथे पक्षाची महाराष्ट्र प्रदेश वर्किग कमेटीची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.आठवले साहेबांनी राज्यातील जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करीत डॉ.चलवादी यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्तीची संघटनात्मक घोषणा केली.

तीन दशकांहून अधिकचा सामाजिक-राजकीय कार्याचा अनुभव असलेले डॉ.चलवादी यांनी २४ मार्च २०२६ रोजी आरपीआय पक्षात प्रवेश करीत मा.आठवले साहेबांच्या नेतृत्वात बहुजन चळवळीत काम करण्याचा निर्धार सोडला होता.पक्षाची प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर पक्ष संघटनात्मक कामासह पक्ष विस्ताराचे कार्य प्रामुख्याने हाती घेवू, अशी भावना डॉ.चलवादी यांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande