रत्नागिरी : राजापूरच्या पाणीटंचाईवर तात्काळ उपाययोजना करा- आ. सामंत
रत्नागिरी, 6 एप्रिल, (हिं. स.) : राजापूर शहरासह ग्रामीण भागात पाणीटंचाई काळात निर्माण होणाऱ्या समस्यांवर तत्काळ उपाययोजना कराव्यात तसेच पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, अशा सूचना आमदार किरण सामंत यांनी सोमवारी प्रशासनाला दिल्य
राजापूरची पाणीपुरवठा आढावा बैठक


रत्नागिरी, 6 एप्रिल, (हिं. स.) : राजापूर शहरासह ग्रामीण भागात पाणीटंचाई काळात निर्माण होणाऱ्या समस्यांवर तत्काळ उपाययोजना कराव्यात तसेच पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, अशा सूचना आमदार किरण सामंत यांनी सोमवारी प्रशासनाला दिल्या.

राजापुरात आयोजित बैठकीत आमदार सामंत यांनी विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शहर व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांबाबत सविस्तर माहिती घेतली. नगरपालिकेचे पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे यांच्याकडून शहरातील पाणीपुरवठा व सुरू असलेल्या योजनांची माहिती घेतली, तर ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना व सद्यःस्थितीबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता प्रशांत पोवार यांनी माहिती दिली.

अपूर्ण योजना तातडीने पूर्ण करून टंचाईकाळात पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश आमदार सामंत यांनी दिले. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांनी करावयाच्या उपाययोजना वेळेत पूर्ण करून आपत्तीजन्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहावे, जनतेची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीस पोलीस निरीक्षक अमित यादव, नायब तहसीलदार विलास सरफरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. कांबळे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता संतोष भालेकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता प्रशांत पोवार आदी अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande