
बीड, 07 एप्रिल, (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ८८ ग्रामपंचायतींच्या सदस्य आणि सरपंच पदासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतपणे सुरू झाला आहे. यामध्ये १६ सरपंच आणि ७२ सदस्य पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून, इच्छुक उमेदवारांना १३ एप्रिलपर्यंत आपले नामनिर्देशन पत्र ऑफलाइन पद्धतीने सादर करता येणार आहेत. मृत्यू, राजीनामा किंवा अपात्रतेमुळे रिक्त झालेल्या या जागांसाठी २८ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून २९ एप्रिलला मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाईल.
विशेषतः मस्साजोग येथील सरपंच पदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. उमेदवारांना अर्जासोबत वयाचा पुरावा, शौचालय वापर आणि दोनपेक्षा जास्त अपत्ये नसल्याचे दाखले देणे अनिवार्य करण्यात आले आहे. या पोटनिवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून आजपासून तहसील कार्यालयांमध्ये अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis