
नांदेड, 07 एप्रिल, (हिं.स.)। भाजपा पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम आ. डॉ. तुषार राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून मुखेड नगरीचे माजी नगराध्यक्ष मा. गंगाधरराव राठोड यांच्या हस्ते भाजपा ध्वजारोहण व पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित खुशाल पाटील उमदरीकर, अशोकराव गजलवाड, राजकुमार बामणे, नागनाथ लोखंडे, पंडित पाटील, मैनोद्दीन शेख, हेमंत घाटे, गजानन लांगेवाड, शौकत होणवडाजकर, करण रोडगे, विनोद दडलवाड, किशोरसिह चौहान, भाजपा संयोजक राजू गंदपवाड, संदीप बादेवाड, गजानन आकुलवाड, खाजा धुंदी, बाळू नाईक, शिवा समराले, शिवाजी राठोड, ओम चौधरी, प्रशांत लालपालवाले, गजानन चिंतमवाड, गिरिधर पाटील होणवडज, गोविंद गाडगेवार, संदीप पिल्लेवाड, उमाकांत पाटील, बाळू आडगुलवार, काशिनाथ येवते, गणेश आंबेकर, दिवाकर पाळे, नागेश दादा गोपनर, कमलाकर अगदे, नागनाथ बर्ले, कोंडीबा गायकवाड, शिवाजी चव्हाण, बालाजी पाटील, सर्वांनी पक्षाच्या विचारधारेप्रती आपली निष्ठा व्यक्त करत, देशसेवा आणि समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प केला.
भारतीय जनता पक्षाचा इतिहास हा देशाच्या राजकीय आणि सामाजिक परिवर्तनाशी निगडित आहे. ६ एप्रिल १९८० रोजी भाजपा पक्षाची स्थापना झाली. भारतीय जनसंघाच्या विचारधारेतून उदयास आलेल्या या पक्षाने राष्ट्रवाद, सुशासन आणि सर्वसमावेशक विकास या तत्वांवर आपली वाटचाल सुरू केली. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने देशाच्या राजकारणात भक्कम स्थान निर्माण केले. काळाच्या ओघात भाजपा हा देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आला असून, केंद्रात आणि विविध राज्यांत सत्तेत राहून अनेक विकासात्मक निर्णय घेतले आहेत.
कार्यक्रमात आ. डॉ. तुषार राठोड साहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने केलेल्या विकासकामांचा आणि जनतेसाठी राबविलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. भाजपा पक्ष हा सर्वसामान्यांच्या आशा-अपेक्षांचा केंद्रबिंदू असून, सबका साथ, सबका विकास या तत्वावर काम करत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. तसेच, आगामी काळात पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी आणि जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले असून, भाजपा पक्षाच्या विचारांना अधिक बळ देण्याची प्रेरणा सर्वांना मिळाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis