विश्व कल्याणासाठी छत्रपती संभाजीनगर सज्ज
छत्रपती संभाजीनगर, 07 एप्रिल (हिं.स.)। जागतिक शांतता, आत्मशुद्धी आणि विश्व कल्याणाचा संदेश देण्यासाठी शहरात ९ एप्रिल रोजी ''विश्व नवकार दिवसा'' निमित्त अभूतपूर्व सामूहिक जप अनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले आहे. सकल जैन समाज, जितो आणि नवकार फाउंडेशन
विश्व कल्याणासाठी छत्रपती संभाजीनगर सज्ज


छत्रपती संभाजीनगर, 07 एप्रिल (हिं.स.)। जागतिक शांतता, आत्मशुद्धी आणि विश्व कल्याणाचा संदेश देण्यासाठी शहरात ९ एप्रिल रोजी 'विश्व नवकार दिवसा' निमित्त अभूतपूर्व सामूहिक जप अनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले आहे. सकल जैन समाज, जितो आणि नवकार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील हिराकाका प्रांगणात सकाळी ७ ते १० या वेळेत हा सोहळा होईल. या ऐतिहासिक दिवशी नवकार महामंत्राचा संकल्प पूर्ण करून विश्वविक्रम प्रस्थापित केला जाणार आहे.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे देशाचे गृहमंत्री अमित शाह हे स्वतः नवकार मंत्राचे पठण करून या मंगलमय उपक्रमाची सुरुवात करणार

आहेत. सकाळी ८:०१ ते दुपारी १:३६ या वेळेत या कार्यक्रमाचे संपूर्ण देशात थेट प्रक्षेपण केले जाईल. या महाकुंभात केवळ भारतच नव्हे, तर जगातील विविध देश सहभागी होणार आहेत.

मोठ्या संख्येने संस्था आणि कुटुंबांचा यात सहभाग असेल. हजारो साधू-साध्वीजींचा यावेळी आशीर्वाद लाभणार आहे. राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतील.

७ वा.सकाळी हा सोहळा सुरू होऊन १० वाजता जप अनुष्ठान पूर्ण होईल. हा एक अभूतपूर्व सोहळा ठरण्याचे संकेत आहेत.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande