
नांदेड, 07 एप्रिल, (हिं.स.)। लोहा नगर पालिकेच्या जुन्या शहरात जाणारा मस्जिद ते पूल असा सिमेंट रस्ता प्रशस्त झाला आहे. विधिमंडळ उपविधान समितीचे अध्यक्ष आ प्रतापराव पाटील चिखलीकर याचा ड्रीम प्रोजेक्ट पैकी एक असलेले भव्य असे बुद्ध विहाराचे काम अंतिम टप्प्यात असून स्वामी समर्थ मंदिर परिसरात एक कोटीचे नमो उद्यान साकारत आहे. शहरात प्रवेश करताना छत्रपती शिवाजी महाराज मुख्य चौक अतिशय आकर्षक व प्रशस्त होत असून तेथे भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे. काम पूर्णत्वास गेल्या नंतर शहराच्या वैभवात भर पडणार हा चौक होणार आहे लोहा शहरात सत्तांतर झाल्या नंतर नगराध्यक्ष शरद पवार उपनगराध्यक्ष करिम शेख व टीम याची स्वच्छ सुंदर शहर हा उपक्रम हाती घेतला. आ प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नगर पालिकेत पार पडलेल्या अधिकाऱ्यांच्या पहिल्याच बैठकीत लोहा शहरात दुकानाच्या समोर बॅनर लावू नये अशी सक्त ताकीद दिली.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बॅनर लावताना नगर पालिकेने नेमून दिलेल्या जागेवर बॅनर लावावे सामाजिक व विधायक उपक्रमराबवावेत असे आवाहन नगराध्यक्ष शरद पवार व टीमच्या वतीने करण्यात आले आहे.
जुना लोहा शहरात जाणार प्रशस्त रस्ता झाला आहे. लवकरच सार्वजनिक शौचालय उभारण्याचे काम पूर्णत्वास जाईल .आ प्रतापराव पाटील यांनी नेहमीच शहराच्या विकासासाठी निधी दिला आहे. युवा नेते प्राविण पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष शरद पाटील व टीम चांगले काम करीत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभिकारण अंतिम टप्प्यात आहे. तर जगतज्योति महात्मा बसवेश्वर याचा पुतळ्याचे सुशोभिकरणं करण्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावी असे पत्र आ चिखलीकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
शहरातील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या समोर भव्य असा चौक आहे. या चौकाचे सुशोभिकारण ४० लक्ष रुपये खर्चुन केले जात आहे
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis