कापसाच्या दरात एकाच वेळी 700ते 800रुपयांची वाढ
अमरावती, 07 एप्रिल : डॉलर व कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे जागतिक बाजारात कापसाचा दर मोठ्या प्रमाणात वाढला असून, शेतकऱ्यांमध्ये या वाढीचा थेट फायदा सर्वत्र मिळणार नाही, असा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रुईचा दर ७१ सेंट प्रति पाउंडवर पोहोचला असून,
कापूस पोहचला 8300रुपयांवर कापसाच्या दरात एकाच वेळी 700ते 800रु ने वाढ


अमरावती, 07 एप्रिल : डॉलर व कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे जागतिक बाजारात कापसाचा दर मोठ्या प्रमाणात वाढला असून, शेतकऱ्यांमध्ये या वाढीचा थेट फायदा सर्वत्र मिळणार नाही, असा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रुईचा दर ७१ सेंट प्रति पाउंडवर पोहोचला असून, स्थानिक बाजारात कापसाचे भाव ८३०० रुपये क्विंटलवर गेले आहेत.

व्यापाऱ्यांच्या मते, डॉलरमूल्य व क्रूड ऑइलच्या किमती वाढल्याने पॉलिस्टर कापड महाग झाले आहे. त्यामुळे पॉलिस्टरला पर्याय म्हणून नैसर्गिक कापसाची मागणी वाढली असून, जागतिक बाजारात रुईचे दर ३० ते ३५ टक्क्यांनी वाढले आहेत. सरकीच्या दरातही वाढ झाल्यामुळे कापसाला स्थानिक बाजारात आणखी उभार मिळाला आहे.

तथापि, फार कमी शेतकऱ्यांनीच दरवाढीची प्रतीक्षा करत कापसाची साठवणूक केली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी ‘सीसीआय’ केंद्रांवर विक्री करून हमीभाव मिळवला, त्यामुळे दरवाढीचा प्रत्यक्ष फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना फारसा मिळणार नाही.

स्थानिक बाजारात पशुखाद्यासाठी सरकीची मागणी वाढल्यामुळे तसेच खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे भाव तेजीत आहेत. जीनिंग व प्रेसिंग यंत्रणांनी कापसाची खरेदी वाढवली असली तरी उपलब्ध साठा कमी असल्याने बाजारात पुरवठा मर्यादित आहे. या परिस्थितीत मोठ्या शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत साठवणूक केली आहे, तर लहान शेतकऱ्यांना नव्या दरवाढीचा लाभ मिळण्यास मर्यादा आहेत.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande