
छत्रपती संभाजीनगर, 07 एप्रिल, (हिं.स.)। मागील अनेक दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असून, त्यात विशेषतः कंपनीच्या ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सिलेंडर बुकिंगच होत नसल्याने नागरिकांना विविध पर्यायांचा शोध घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे.
प्रशासन आणि गॅस एजन्सीकडून पुरवठा सुरळीत सुरू असल्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच दिसून येत आहे. शहरातील विविध भागांत नागरिकांना सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. बुकिंग केल्यानंतरही वेळेत गॅस मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
दरम्यान, भारत पेट्रोलियम (भारत) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपी) कंपन्यांचे सिलेंडर बुकिंग सुरू असले तरी त्यांचा पुरवठा विलंबाने होत असल्याने ग्राहक त्रस्त आहेत. बुकिंगसाठी सर्व्हरची अडचण येत आहे. कंपनीकडून बुकिंगसाठी विविध प्रकारचे बदल करण्यात येत असल्याने ग्राहकांना सिलेंडर बुक करण्याची समस्या जाणवत आहे. यातून लवकरच मार्ग निघेल. ग्राहकांनी नवीन अॅपद्वारे बुकिंग केल्यास त्यांना सिलेंडर बुक करता येईल.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis