
लातूर, 07 एप्रिल, (हिं.स.)। 11 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान शासनाने एक परिपत्रक काढून इयत्ता अकरावीच्या परीक्षा वरील कालावधीत घ्याव्यात व याचवेळी वार्षिक तपासणी होणार आहे असे आदेशित केलेले आहे. त्या आदेशाला विरोध म्हणून जुक्टा संघटनेने शिक्षण मंत्री दादा भुसे यांना शिक्षण उपसंचालक यांच्यामार्फत निवेदन दिले. या निवेदनात जवळपास सर्व शाळांनी अकरावी परीक्षेचे नियोजन करून परीक्षा घेतलेले आहेत व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी 11 वी विद्यार्थ्यांचे उन्हाळी वर्ग सुरू केलेले आहेत. त्यामुळे या परीक्षा व वार्षिक तपासणी रद्द करण्यात यावी हे निवेदन सहाय्यक शिक्षण संचालक संजयजी पंचगल्ले यांना देण्यात आले.
यावेळी राज्य महासंघाचे उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष शिवराम सूर्यवंशी, विभागीय अध्यक्ष तथा जिल्हा सचिव प्रा.बाळासाहेब बचाटे, कार्याध्यक्ष प्रा. संजय भंडारे उपाध्यक्ष प्रा. सी. जी. पाटील, सहसचिव प्रा. आर. पी. केंद्रे, कार्यालयीन सचिव प्रा. राजेंद्र नागरगोजे, लातूर तालुका सचिव प्रा. एन.एस. जाधव औसा तालुका सचिव प्रा. संजय बिराजदार, उपाध्यक्ष प्रा. राजकुमार हलकुडे, प्रा लहुकांत शेवाळे, औसा तालुका जिल्हा प्रतिनिधी प्रा .गजानन तनशेटे, प्रा. ज्ञानोबा मोरे, प्रा अंतेश्वर माने आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis