
छत्रपती संभाजीनगर, 07 एप्रिल (हिं.स.)। पीईएस अभियांत्रिकीमहाविद्यालयात आठ एप्रिल ते १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धम्मदेसना, व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम, १८ तास अभ्यास अभियान घेण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांच्या वर्गणीतून जयंती उत्सव साजरा करण्यात येत असल्याची माहिती प्राचार्य डॉ. अभिजित वाढेकर यांनी दिली. या उपक्रमांतर्गत ८ एप्रिलला सकाळी अकराला भदंत पय्यारत्न हे धम्मदेसना देतील. त्याच दिवशी संध्याकाळी सहाला साहित्यिक व व्याख्यात्या अनिता भारती यांचे 'महिलांसाठी डॉ. आंबेडकरांचे योगदान' या विषयावर व्याख्यान होईल. ९ एप्रिलला सायंकाळी सहाला अभिनेते व दिग्दर्शक वामसी मट्टा 'कला नेमकी कोणाची?' या विषयावर विचार मांडतील. १० एप्रिलला ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे 'डॉ. आंबेडकरांचे पत्रकारितेतील योगदान' या विषयावर मार्गदर्शन करतील. ११ एप्रिलला सकाळी साडेदहाला रक्तदान शिबिर, सायंकाळी सहाला विद्यार्थ्यांच्या सहभागातून सांस्कृतिक कार्यक्रमासह रक्तदान शिबिर होणार आहे. १२ एप्रिलला '१८ तास अभ्यास अभियान' राबवण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis