
छत्रपती संभाजीनगर, 07 एप्रिल (हिं.स.)। शेतीचा वाढता खर्च कमी करण्यासाठी आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) व पाणी फाउंडेशन सरसावले आहे. या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने कन्नड, सोयगाव आणि सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष 'डिजिटल शेती शाळे'चे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (ता. आठ) सायंकाळी ७.३० ला या कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
याद्वारे शेतकऱ्यांना घरच्या घरी नैसर्गिक खते व कीटकनाशके (निविष्ठा) तयार करण्याचे शास्त्रशुद्ध तंत्र शिकवले जाणार आहे.
सध्या रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या किमती गगनाला भिडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. यावर पर्याय म्हणून 'नैसर्गिक निविष्ठा' हा प्रभावी मार्ग आहे. स्वतःच्या शेतातील उपलब्ध साहित्यापासून खते कशी तयार करावीत, यावर या शाळेत विशेष भर दिला जाणार आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे
डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने जय्यत तयारी केली आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis