
नांदेड, 07 एप्रिल (हिं.स.)। नांदेड शहरात मागील तीन दिवसांत खुनाच्या पाच घटना घडल्याने परिस्थिती गंभीर बनली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी तातडीने प्रभावी पावले उचलावीत, मागणी अशी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण केली. यांनी पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, गुन्हेगारी नियंत्रणात ठेवणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. या कामात आम्ही पूर्ण सहकार्य करू. मात्र, कोणत्याही गुंडांना राजाश्रय मिळू नये.
सखोल तपास करून दोषींवर कारवाई करा
या घटनांमागे नेमके कोण आहे, याचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले, 'जे घडले ते अत्यंत वाईट असून ही गंभीर व चिंतेची बाब आहे.
अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाई करून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवावे.
नांदेड शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis