
छत्रपती संभाजीनगर, 07 एप्रिल (हिं.स.)।मनुष्याने लोभ,क्रोध, अहंकार आणि मोह यावर नियंत्रण ठेवले तरच जीवनात खरा आनंद प्राप्त होतो. क्षमा, करुणा, दया आणि सत्य या मूल्यांचा अंगीकार केल्यास जीवन अधिक सुंदर बनते. जास्त मिळवण्याच्या स्पर्धेत माणूस स्वतःचे सुख हरवतो. त्यात समाधान मानणारा, धर्म मार्गावर चालणारा व्यक्तीच खऱ्या अर्थान सुखी असतो, असे मार्गदर्शन राजाबाजार जैन मंदिरात झालेल्या प्रवचनमालेत धर्मगुरू आचार्य पुष्पदंतसागर गुरुदेव यांनी 'सुखी जीवन' विषयावर केले.
जैन मंदिर परिसरात सकल जैन समाजाच्या उपस्थितीत पुष्पदंतसागर गुरुदेव तसेच पर्वसागर व क्षुल्लक प्रशांतसागर यांच्या पवित्र सान्निध्यात मंगल प्रवचनमालेची तृतीय मालिका पार पडली. यावेळी गुरू भक्त भरतवीर मिडा, रमेश ढोटिया, महावीर पाटणी, महावीर ठोले,
अरुण पाटनी, मुकेश साहू, किरण पहाडे, अनिल संचेती, संजय संचेती, शोभा लोहाडे, शकुंतला बोहरा, मान्यवर उपस्थित होते.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis