स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण सप्ताहाचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 07 एप्रिल (हिं.स.)। श्रीस्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह शहरातील २४ त्रिकाल आरती केंद्रे तसेच संपूर्ण जिल्ह्यातील १३० सेवा केंद्रांमध्ये ९ ते १७एप्रिल या कालावधीत संपन्न होणार आहे. या सप्ताहात गणेश, मनोबोध, रुद्र, स्वामी, चंडी, मल्
स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण सप्ताहाचे आयोजन


छत्रपती संभाजीनगर, 07 एप्रिल (हिं.स.)। श्रीस्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह शहरातील २४ त्रिकाल आरती केंद्रे तसेच संपूर्ण जिल्ह्यातील १३० सेवा केंद्रांमध्ये ९ ते १७एप्रिल या कालावधीत संपन्न होणार आहे.

या सप्ताहात गणेश, मनोबोध, रुद्र, स्वामी, चंडी, मल्हारी, गीताई इत्यादी विविध यागांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण हजारो सेवेकऱ्यांच्या सहभागातून होणार असून स्वामी चरित्र, दुर्गा सप्तशती, नवनाथ, भागवत, श्रीपाद श्रीवल्लभ आदी ग्रंथांचे वाचन करण्यात येणार आहे. यासोबतच सामुदायिकस्वरूपात श्री स्वामी मंत्र, गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र, नवार्णव मंत्र आदी मंत्रांचा जप केला जाणार आहे. सप्ताहादरम्यान विविधसामाजिक उपक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. यामध्ये रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, विवाह नोंदणी, बालसंस्कार शिबीर, तसेच मोफत कायदेशीर सल्ला शिबीरांचा समावेश आहे.

दररोज सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत महिलांचे प्रहर, तर सायंकाळी ७ ते सकाळी ७या वेळेत पुरुषांचे प्रहर असे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक प्रहरात २ जण विणा वादनसद्यः स्थितीतील युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता देशावर येणारी विविध संकटे दूर व्हावीत यासाठी प. पू. गुरुमाऊली यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक दुर्गा सप्तशती पाठाचे विशेष आयोजन करण्यात आले असून संपूर्ण महाराष्ट्रात लाखो पाठांचे वाचन होणार आहे. या सप्ताहाची सांगता १५ एप्रिल रोजी सत्यदत्त पूजनानंतर महाप्रसादाने होणार आहे, अशी माहिती सेवा मार्गातर्फे शशी पाटील यांनी दिली आहे.नामजप, २ जण माळा जप आणि २ जण स्वामी चरित्र वाचन अशा पद्धतीने २४ तास सेवा अखंड सुरू राहणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande