
लातूर, 07 एप्रिल (हिं.स.) । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात दहा मार्च 2026 पासून झाली असून, ही नोंदणी आता ऑफलाइन तसेच QR कोड स्कॅन करून ऑनलाईन केली जाऊ शकते. याअंतर्गत बोरोळ चौकात तालुका अध्यक्ष सोमनाथ कलशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सदस्य नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली.
या उपक्रमाला शहरासह देवणी तालुक्यातूनही भरभरून पाठिंबा मिळाला. पहिल्या टप्प्यात, 6 एप्रिल रोजी ऑफलाइन फॉर्म भरून सदस्य नोंदणी करण्यात आली, तर यानंतर ही नोंदणी मनसेच्या संकेतस्थळावरून व QR कोड स्कॅन करून घेतली जाणार असल्याची माहिती सोमनाथ कलशेट्टी यांनी दिली.
सोमनाथ कलशेट्टी हे पक्षाच्या स्थापनेपासूनच राज साहेब ठाकरे यांच्या विचारांवर प्रभावीत राहिलेले असून, मनसेचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम सातत्याने करत आहेत. त्यांनी सर्व पक्षांचे चढउतार पाहिले, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल आपली श्रद्धा कायम ठेवली आहे. कलशेट्टी म्हणाले, “महाराष्ट्राला राज साहेब ठाकरे यांच्या विचारांची गरज आहे; यासाठी भविष्यामध्ये नवनिर्माण सेनेची सत्ता येईल असा माझा विश्वास आहे.”
नोंदणी अभियानात उपाध्यक्ष प्रताप चामले, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष आकाश हिंडे, तसेच कार्यकर्ते सुनील मानकरी, नागराज तोगरगे, प्रदीप हिंडे, आश्विन मोरे, मडोळ रासुरे, गोविंदा ऐनिले, चंद्रकांत बिरादार, मार्तंड हिंडे, रामराव वाटते, धनराज भांडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या उपक्रमामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय व धोरण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम अधिक प्रभावी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis