
लातूर, 07 एप्रिल (हिं.स.)। माहेश्वरी समाजाची नूतन तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी राधेश्याम जगन्नाथ बाहेती तर सचिवपदी भगवान जयनारायण भुतडा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकिशनजी सोमानी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष बैठकीत ही घोषणा करण्यात आली.
नवीन निवडीनुसार, समाजाच्या विविध जबाबदाऱ्या खालील पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आल्या आहेत:
अध्यक्ष: राधेश्याम जगन्नाथ बाहेती
सचिव: भगवान जयनारायण भुतडा
उपाध्यक्ष: गोपाल भराडिया
सहसचिव: ईश्वर भूतडा
कोषाध्यक्ष: पुरुषोत्तम मालू
संघटन मंत्री: दिनेश बजाज
जिल्हा प्रतिनिधी म्हणून यांची निवड:
समाजाच्या जिल्हास्तरीय कामकाजासाठी श्यामसुंदर सोनी, अमृतलाल जाजू, रामप्रसाद जाजू आणि बालाप्रसाद काबरा यांची जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे.
नूतन कार्यकारिणीची घोषणा होताच उपस्थित समाज बांधवांनी टाळ्यांच्या गजरात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना नूतन पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात माहेश्वरी महासभेच्या माध्यमातून 'सेवा, त्याग आणि सदाचार' या ब्रीदवाक्याला अनुसरून मोठ्या प्रमाणात समाजकार्य केले जाईल. समाजातील एकोपा वाढवण्यासाठी आणि विविध सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी ही कार्यकारिणी कटिबद्ध राहील.
या बैठकीस अहमदपूर शहरातील माहेश्वरी समाजातील मान्यवर आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनियुक्त कार्यकारिणीचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन व स्वागत करण्यात येत आहे.
नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल 'पोलीस फ्लॅश न्यूज' परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis