
नांदेड, 07 एप्रिल (हिं.स.)। होलार समाजाच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने महा. राज्य युती सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सरकारने होलार समाज आर्थिक विकास महामंडळ, मर्या. उपकंपनी (संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, लिडकॉम मर्यादित) स्थापन केलेली आहे. एक महत्त्वपूर्ण विकासात्मक बाब म्हणून दि. 8 एप्रिल 2026 बुधवार रोजी सकाळी 11:00 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नांदेड. (नमस्कार चौक) येथे होलार समाज आर्थिक विकास महामंडळ मर्या. उपकंपनी या फलकाचे अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या फलकाचे अनावरण अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष मा. माधवराव होनमाने यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मराठवाडा अध्यक्ष साहित्यिक प्रा. वैजनाथ सुरनर, प्रा. बालाजीराव भुरे, राजकुमार येळगे, नामदेवराव देवकत्ते, अण्णासाहेब
जाहीरे जुन्नेकर, महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक श्रीमती संगीता पराते, प्रा. गोविंद देवकत्ते, गोविंदराव ढोणे, सखाराम खांडेकर, सुभाष देवकत्ते, गोविंदराव वाडीकर, उत्तमराव टाळीकोटे, देविदास भजने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नांदेड जिल्ह्यातील होलार समाज बांधव, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अशोक देवकत्ते, नामदेव बाजगिरे, यादव ढोणे, खंडू देवकत्ते, व्यंकट देवकत्ते, तातेराव टाळीकोटे, शिवाजी टाळीकोटे, ज्ञानेश्वर जाहीरे, संजय टाळीकोटे, कृष्णा देवकत्ते, प्रकाश सुरनर, प्रल्हाद टाळीकोटे, राजेश गवते, बळीराम खपराळे, जालिंदर टाळीकोटे, विकास खांडेकर, संग्राम देवकत्ते, गणपत टाळीकोटे, गोपाळ देवकत्ते, रघुनाथ पारसे, बालाजी देवकत्ते, लालू वगे, आनंद आवळे, देविदास होलबोले, राजेंद्र आवळे, नागनाथ बंडगिरे यांनी केले आहे. हा सोहळा होलार समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने, एक महत्त्वाचा विकासात्मक टप्पा ठरणार असल्याची भावना समाज बांधवांमध्ये व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis