छ. संभाजीनगरमध्ये ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खतासंदर्भात कार्यशाळा संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 07 एप्रिल, (हिं.स.)। येथील श्री सरस्वती भुवन (सभु) शिक्षण संस्थेच्या परिसरातील ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करून त्या कचऱ्याचे रूपांतर जैविक खतामध्ये व्हावे, या हेतूने स.भु. विज्ञान महाविद्यालयामध्ये कार्यशाळा घेण्यात आली. संस्थेचे
छ. संभाजीनगरमध्ये ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खतासंदर्भात कार्यशाळा संपन्न


छत्रपती संभाजीनगर, 07 एप्रिल, (हिं.स.)। येथील श्री सरस्वती भुवन (सभु) शिक्षण संस्थेच्या परिसरातील ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करून त्या कचऱ्याचे रूपांतर जैविक खतामध्ये व्हावे, या हेतूने स.भु. विज्ञान महाविद्यालयामध्ये कार्यशाळा घेण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष अॅड. दिनेश वकील, सरचिटणिस डॉ. श्रीरंग देशपांडे आणि सहचिटणीस डॉ. रश्मी बोरीकर यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा पार पडली.

संस्थेच्या स्थानिक शाखांमधील सेंद्रिय कचरा परिसरातच जिरवून त्याचे कंपोस्ट करावे आणि परिसर स्वच्छ ठेवावा या हेतूने या उपक्रमास सुरवात केली. उपप्राचार्य डॉ. क्षमा खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात स.भु. परिसराअंतर्गत येणाऱ्या शाळेतील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांना आम्ही पर्यावरणप्रेमी मंचचे रूपेश कलंत्री यांनी दृकश्राव्य माध्यमातून घनकचरा व्यवस्थापना संदर्भात मार्गदर्शन केले. 'हवी शुद्ध हवा' या समूहाचे भूमकर यांनी महाविद्यालयातील ओला घनकचऱ्यावर जैवरसायन वापरून खतनिर्मिती कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखविले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सहचिटणीस डॉ. रश्मी बोरीकर होत्या. डॉ. क्षमा खोब्रागडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमासाठी प्रा. सोनल हिवराळे आणि प्रा. सागर गवळी यांनी पुढाकार घेतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande