बीडमध्ये भैरवनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची लागली रिघ
बीड, 08 एप्रिल (हिं.स.)। वाळुंज येथील भैरवनाथ यात्रेनिमित्त आमदार सुरेश धस यांच्या हस्ते अभिषेक व महाआरती करण्यात आली. भैरवनाथांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. वाळुंज परिसरातील मंगरूळ, चिखली, टाकळसिंग जामगाव, देव्हीघव्हाण, पारगाव,
बीडमध्ये भैरवनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची लागली रिघ


बीड, 08 एप्रिल (हिं.स.)। वाळुंज येथील भैरवनाथ यात्रेनिमित्त आमदार सुरेश धस यांच्या हस्ते अभिषेक व महाआरती करण्यात आली. भैरवनाथांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

वाळुंज परिसरातील मंगरूळ, चिखली, टाकळसिंग जामगाव, देव्हीघव्हाण, पारगाव, केळसांगवी, हिंगणी, डोणगाव, सांगवी या गावातल्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. पर जिल्ह्यात नोकरी व व्यवसायाच्या निमित्त असलेले अहिल्यानगर, पुणे, मुंबई, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, नाशिक येथील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यात्रेनिमित्त कुस्त्यांचा फड रंगला. यशस्वीतेसाठी सरपंच सुरेश सातपुते, उपसरपंच बंडू सोले, ज्येष्ठ नेते रघुनाथ शिंदे आदींनी परिश्रम घेतले. आष्टी तालुक्यातील वाळुंज येथे भैरवनाथाच्च्या यात्रे निमित्त भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती.

--------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande