परभणी : पालम ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी 40 हजार रुपयांची लाच स्विकारतांना ताब्यात
परभणी, 08 एप्रिल (हिं.स.)। परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तथा पालम ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय अधिक्षक म्हणून अतिरिक्त पदभार असणारे डॉ.रमेश दगडोबा खंदारे यांना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने 8 एप्रिल रोजी 40 हजार रुपयां
परभणी : पालम ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी 40 हजार रुपयांची लाच स्विकारतांना ताब्यात


परभणी, 08 एप्रिल (हिं.स.)।

परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तथा पालम ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय अधिक्षक म्हणून अतिरिक्त पदभार असणारे डॉ.रमेश दगडोबा खंदारे यांना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने 8 एप्रिल रोजी 40 हजार रुपयांची लाच स्विकारतांना ताब्यात घेतले. एका तक्रारकर्त्याने लाच लुचपत प्रतिबंधक खात्यात 2 एप्रिल रोजी एक तक्रार दाखल केली होती. त्याद्वारे, त्यांचे भावाचे नावाने परिवर्तन लेबर कॉन्ट्रॅक्टर टॅन्ड मल्टिसर्व्हिस फर्मचे ते कामकाज पाहतात. सदर फर्म मार्फत पालमच्या ग्रामीण रुग्णालयात स्वच्छतेच्या सेवेकरीता कोटेशन बेसवर टेंडर भरले होते. ते टेंडर मंजूर करणे कामी या रुग्णालयाचे अतिरिक्त पदभार असणारे वैद्यकीय अधिक्षक डॉ. रमेश खंदारे यांनी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली, असे तक्रारीत नमूद केले.या तक्रारीच्या आधारे या खात्याने 8 एप्रिल रोजी लाच मागणी संदर्भात पडताळणी केली तेव्हा वैद्यकीय अधिक्षक डॉ. खंदारे यांनी पंचासमक्ष तडजोडी अंती 40 हजार रुपयांची मागणी केली. तसेच तात्काळ रक्कम घेऊन येण्यास सांगितले. तेव्हा या खात्याने लगेचच पालमच्या ग्रामीण रुग्णालयात सापळा रचला, त्यात वैद्यकीय अधिक्षक डॉ. खंदारे हे संबंधित तक्रारकर्त्याकडून स्वच्छता सेवाच्या टेंडर मंजूरीकरीता स्वतः 40 हजार रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडल्या गेले. दरम्यान, या पथकाने डॉ. खंदारे यांची अंग झडती घेतली. त्यांच्याकडील रोख 2 हजार 120 रुपये, सॅमसंग कंपनीचा मोबाईल व चारचाकी वाहनातील रोख 15 हजार रुपये ताब्यात घेतले. मोबाईल जप्त केला. तर डॉ. खंदारे यांच्या घराच्या झडतीची प्रक्रियाही सुरु केली. दरम्यान, या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलिस उपअधिक्षक महेश पाटणकर, सापळा अधिकारी तथा पोलिस निरीक्षक बाबासाहेब थोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande