अकोला: बाळापूरात तब्बल 26 लाखाचा गांजा जप्त
अकोला, 08 एप्रिल (हिं.स.)। अकोल्यातील बाळापूर शहरातील बेलदारपुरा आसरा माता मंदीर जवळ गांजा तस्करी करणाऱ्याविरुध्द मोठी कारवाई करण्यात आली असुन या कारवाईमध्ये 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोन आरोपीना ताब्यात घेतले..हि कारवाई अकोला येथील स्थ
Photo


अकोला, 08 एप्रिल (हिं.स.)।

अकोल्यातील बाळापूर शहरातील बेलदारपुरा आसरा माता मंदीर जवळ गांजा तस्करी करणाऱ्याविरुध्द मोठी कारवाई करण्यात आली असुन या कारवाईमध्ये 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोन आरोपीना ताब्यात घेतले..हि कारवाई अकोला येथील स्थानीक गुन्हे शाखा व बाळापूर पोलीसांनी संयुक्त रित्या केली. बाळापूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या संयुक्त विद्यमानाने बाळापूर शहरात गांजा तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली.. तब्बल 26 लाखांचा गांजा तस्करी करताना पकडलाय.. दोघांसह गांजा तस्करीसाठी वापरण्यात येणारी कार आणि ट्रक पोलिसांनी जप्त केलाय. अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.. राष्ट्रीय महामार्गावरील बेलदारपुरा भागातील आसरा मंदिराजवळ पोलिसांनी ट्रक आणि कारमधून गांजाची वाहतूक करताना या दोघांना पकडले आहे.. मोहम्मद असलम मोहम्मद आजम, मोहम्मद अजमल मोहम्मद आजम असं पकडण्यात आलेल्या गांजा तस्करांची नाव आहेत.. बाळापूर पोलिसांनी या कारवाईत एकत्रित 55 लाखांवर मुद्देमाल जप्त केलाय.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande