
अकोला, 08 एप्रिल (हिं.स.)।
अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांची कामगार कल्याण सनियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वौपचार रुग्णालय अकोला येथील सफाई कामगार सचिन चावरे सह कामगारांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कामगारांवर अन्याय अत्याचार सहन केला जाणार नाही असे ठाम विश्वास आमदार साजिद पठाण साहेब यांनी केले असून कामगार वर्ग सुखावले आहे. म्हणुन सर्व कामगारा तर्फे भारतीय कर्मचारी मजदुर युनियन च्या वतीने स्वागत करण्यात आले आहै यावेळी काँग्रेस शहरअध्यक्ष प्रशांत वानखडे, सचिन चावरे,करण सारवान,दीलीप गोहर,अर्जुन सारवान,गणेश ठाकरे,दीपक थोनवाल आदी प्रामुख्याने होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे