डिजिटल अवेअरनेस डे निमित्त दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात प्रवाशांमध्ये कॅशलेस व्यवहारांविषयी जनजागृती
परभणी, 08 एप्रिल (हिं.स.)। दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात आज 8 एप्रिल रोजी विविध स्थानकांवर डिजिटल अवेअरनेस डे उपक्रमांतर्गत प्रवाशांमध्ये कॅशलेस व्यवहारांविषयी जनजागृती करण्यात आली. नांदेड, परभणी, पूर्णा, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली
डिजिटल अवेअरनेस डे निमित्त दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात प्रवाशांमध्ये कॅशलेस व्यवहारांविषयी जनजागृती


परभणी, 08 एप्रिल (हिं.स.)।

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात आज 8 एप्रिल रोजी विविध स्थानकांवर डिजिटल अवेअरनेस डे उपक्रमांतर्गत प्रवाशांमध्ये कॅशलेस व्यवहारांविषयी जनजागृती करण्यात आली. नांदेड, परभणी, पूर्णा, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, वाशीम, आदिलाबाद आदी स्थानकांवर विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. रेल्वे कर्मचार्यांनी सक्रिय सहभाग घेत प्रवाशांशी संवाद साधून डिजिटल पेमेंटचे फायदे, सोय आणि सुरक्षिततेबाबत सविस्तर माहिती दिली. आदिलाबाद स्थानकावर केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रेल्वे कर्मचार्यांसह उत्साहाने सहभाग नोंदवून रेल्वे सेवांसाठी डिजिटल पेमेंटचा अवलंब करण्याचा संदेश दिला. तसेच हुजूर साहिब नांदेड स्थानकावर डिजिटल जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान प्रवाशांना तिकीट खरेदी तसेच इतर रेल्वे सेवांसाठी डिजिटल पेमेंटचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. वाशीम, हिंगोली डेक्कन, जालना आणि छत्रपती संभाजीनगर स्थानकांवर हेल्प डेस्क उभारण्यात आले होते. येथे रेल्वे कर्मचार्यांनी प्रवाशांना विविध डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून तिकीट बुकिंग व इतर देयके कशी करावीत याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमादरम्यान 500 हून अधिक प्रवाशांना डिजिटल पेमेंटचे फायदे तसेच रेल्वे सेवांसाठी उपलब्ध विविध डिजिटल प्लॅटफॉर्मची माहिती देण्यात आसुरक्षित आणिली. यामध्ये ऑनलाईन तिकीट बुकिंग तसेच स्थानकांवरील डिजिटल पेमेंट पर्यायांचा समावेश होता. या उपक्रमामागील उद्देश जलद, सोयीस्कर व्यवहारांसाठी प्रवाशांना डिजिटल पेमेंटचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करणे हा असून, भारत सरकारच्या डिजिटल इंडिया या संकल्पनेला चालना देणे हा आहे. दक्षिण मध्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि डिजिटल सेवांचा प्रसार करण्यासाठी अशा जनजागृती कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करत आहे. भारतीय रेल्वेमध्ये उपलब्ध डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आयआरसीटीसी रेल कनेक्टद्वारे आरक्षित तिकीट बुकिंग, रेलवनद्वारे एकात्मिक रेल्वे सेवा, भीम किंवा युपीआय अॅप्सद्वारे तत्काळ पेमेंट तसेच क्यूआर कोड आधारित तिकीट प्रणाली आणि स्थानकांवरील पीओएस मशीनद्वारे व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. डिजिटल पेमेंटमुळे प्रवाशांना रांगेत उभे राहण्याची गरज राहत नाही, व्यवहार जलद आणि सोयीस्कर होतात, रोख रक्कम बाळगण्याची आवश्यकता कमी होते, व्यवहार सुरक्षित व पारदर्शक राहतात, संपर्करहित प्रवासाला प्रोत्साहन मिळते तसेच 24 तास कुठेही तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande