
छत्रपती संभाजीनगर, 08 एप्रिल (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सव होणार आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवनिमित्त कथाकथन स्पर्धा घेण्यात येणार आहे. सहायक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांच्या हस्ते महात्मा फुले सभागृहात बुधवारी सकाळी ११ वाजता ही स्पर्धा सुरु होईल. विजेत्यांना ३ हजार, २ हजार व एक हजार रुपयांचे रोख पारितोषिक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तर सायंकाळी सहा वाजता प्रख्यात कथाकार अप्पासाहेब खोत यांचे कथाकथन विद्यापीठ नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे, असे विद्यार्थी कल्याण मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis