दस्त नोंदणी कार्यालये, कामकाज वेळ वाढवण्याची मागणी
नरेडकाचा पाठपुरावा ; महसूल मंत्र्यांची सकारात्मक भूमिका नाशिक, 08 एप्रिल (हिं.स.)। : नरेडको नाशिकतर्फे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ४ एप्रिल रोजी नाशिक दौऱ्यात भेट घेण्यात आली. यावेळी रेडी रेकनर दर (२०२६-२७) न वाढवि
Document Registration Offices,


नरेडकाचा पाठपुरावा ; महसूल मंत्र्यांची सकारात्मक भूमिका

नाशिक, 08 एप्रिल (हिं.स.)।

: नरेडको नाशिकतर्फे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ४ एप्रिल रोजी नाशिक दौऱ्यात भेट घेण्यात आली. यावेळी रेडी रेकनर दर (२०२६-२७) न वाढविल्याबद्दल आभार मानण्यात आले. नाशिक शहर व जिल्ह्यात वाढत्या दस्त नोंदणी व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर दस्त नोंदणी कार्यालयांची संख्या ७ वरून किमान १० करण्याची तसेच कामकाज वेळ वाढविण्याची मागणी करण्यात आली.

सध्या ७ दस्त नोंदणी कार्यालये कार्यरत असून वाढती लोकसंख्या, शहरी विस्तार आणि मालमत्ता व्यवहारांमुळे ती अपुरी ठरत आहेत. केवळ एकच कार्यालय शनिवार-रविवारी सुरू आहे, तर दोन कार्यालये सत्र पद्धतीने आणि चार कार्यालये नियमित वेळेत कार्यरत आहेत. यामुळे नागरिकांना दीर्घ प्रतीक्षा व अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागत आहे. नरेडको नाशिकतर्फे शनिवार-रविवार सुरू असलेल्या कार्यालयांची संख्या १ वरून २ करणे, सत्र पद्धतीने चालणारी कार्यालये १ वरून २ करणे तसेच पंचवटी विभागातील मेरी-म्हसरूळ, आडगाव परिसरात नवीन दस्त नोंदणी कार्यालय सुरू करण्याची मागणी करण्यात आली.या निवेदनाची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांना आदेश देत मागण्या तात्काळ पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. या वेळी नरेडको नाशिकचे अध्यक्ष शंतनू देशपांडे, मानद सचिव भाविक ठक्कर, उपाध्यक्ष श्री. मरजयान पटेल, तसेच नरेडको महाराष्ट्रचे उपाध्यक्ष जयेश ठक्कर, सहसचिव प्रशांत पाटील, अभय नेरकर, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्रीमती रुचिता लढा, निरज कोठारी, अश्विन आव्हाड, पवन भगुरकर, मयूर कपटे, शशांक देशपांडे, नितीन सोनवणे आदी उपस्थित होते. नरेडको नाशिकतर्फे महसूल मंत्र्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande