
डोंबिवली, 08 एप्रिल (हिं.स.)। डोंबिवली पश्चिम मोठागाव मानकोली पुलावर तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी पुन्हा समोर आली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका बाइकवर तिघेजण बसून, चालकाचे डोळे झाकून धोकादायक स्टंट करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. वारंवार कारवाईनंतरही स्टंटबाजी सुरूच असल्याने संताप व्यक्त होत असून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. लोकं आता पुलावर पोलिस चौकीची मागणी करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi