
डोंबिवली, 08 एप्रिल, (हिं.स.)। राष्ट्रीय शिक्षण संस्था, रेझिंग ए मॅथेमॅटिशियन फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवल सिटी यांच्या संयुक्त विद्यामाने शालेय विद्यार्थ्यांसाठी गणित विषयासंबंधित मॅथ्स सर्कल उपक्रम संपन्न झाला. राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या डॉ. हेडगेवार सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटी चे अध्यक्ष प्रसाद खोत संस्थाध्यक्ष डॉ. संजय कुलकर्णी, मॅथ्स सर्कल उपक्रम समन्वयक व संस्था उपाध्यक्षा डॉ. सरोज कुलकर्णी, रेझिंग ए मॅथेमॅटिशियन फाउंडेशनच्या वृषाली नायर, रोटरीचे प्रकल्प समन्वयक संतोष नंबुदिरी यांसह रोटरी व रॅम चे सदस्य, संस्था पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ.संजय कुलकर्णी म्हणाले, मॅथ्स सर्कल या उपक्रमाची संकल्पना रेझिंग ए मॅथेमॅटिशनचे विनय नायर यांच्या संपर्कामुळे महाराष्ट्रात प्रथमच राष्ट्रीय शिक्षण संस्थेने सुरू केली. गेली तीन वर्ष हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाचे सर्व व्यवस्थापन संस्था उपाध्यक्षा डॉ. सौ. सरोज कुलकर्णी बघतात. यातून पुढे येणारे विद्यार्थी हे नक्कीच स्वतःच्या क्षेत्रामध्ये नाव कमवतील. रोटरी क्लबच्या मदतीमुळे डोंबिवलीमध्ये ही संधी आमच्या संस्थेला उपलब्ध करून देता आली. विद्यार्थ्यांना मॅथ्स सर्कल हा उपक्रम फायदेशीर ठरेल.
रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रसाद खोत म्हणाले की गणित हे आपल्या डीएनए मध्ये असून हे सुप्त गुण जागृत करण्याचे काम रेझिंग अ मॅथेमॅटिशन व राष्ट्रीय शिक्षण संस्था करीत आहे. गणितातील काम पुढे नेणारे ठरत असून याला आम्ही हातभार लावत आहोत. यातून विद्यार्थ्यांनी गणिताची आवड जोपासावी.
यावेळी मॅथ्स सर्कलचे शिक्षक केदार पेणकर, सुंदरम शर्मा आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर विद्यार्थ्यांमधून कु.समृद्धी झगडे व स्पंदन मयेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यातआले.
या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे जिल्हा सचिव विनेश नायर, मुकेश सोनवणे आदींसह संस्थेचे कार्यवाह शिरीष फडके, कोषाध्यक्ष संजय दीक्षित, संस्था कार्यकारणी सदस्य प्रकाश म्हात्रे, अरुण ऐतवडे यांसह सर्व शाळांचे मुख्याध्यापक, समितीतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi