
नांदेड, 08 अप्रैल (हिं.स.) : अर्धापूर तालुक्यातील चेनापूर सेवा सहकारी सोसायटीच्या जिल्हा बँकेसाठी पंचाबाई गणेशराव राठोड यांच्या नावाचा सर्वानुमते बिनविरोध ठराव चेनापूर येथे पारित करण्यात आला।
बँकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीच्या सर्व संचालक मंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत सर्व संचालकांच्या सहमतीने पंचाबाई गणेशराव राठोड यांचा बिनविरोध ठराव मंजूर केला गेला.
बैठकीत उपस्थित मान्यवरांमध्ये साहेब राव राठोड, बालाजी पुयड, गणपती महागाडे, किशन बालाजी राठोड, शंकर पवार, चिमनाजी डवरे, उत्तमराव वाड, विमलबाई लोणे, गणेश राठोड, सौ. गंगासागर जंगील यांचा समावेश होता।
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी बिनविरोध ठराव घेण्याची प्रक्रिया पार पडण्यासाठी गावातील ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सर्व सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते, ज्यामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुव्यवस्थित झाल्याचे सांगण्यात आले.
------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis