पिंपरी महापालिकेचे दोन महत्त्वाचे पाणीप्रकल्प अजूनही रखडल्याचे चित्र
पिंपरी, 08 एप्रिल (हिं.स.)पिंपरी शहराला उन्हाळ्याच्या तोंडावर पाण्याची तीव्र गरज असताना महापालिकेचे दोन महत्त्वाचे पाणीप्रकल्प अजूनही रखडल्याचे चित्र आहे. तातडीने पाणी मिळावे म्हणून भामा-आसखेड जलवाहिनीच्या ठेकेदाराला बदलण्याची वेळ प्रशासनावर आली, त
PCMC


पिंपरी, 08 एप्रिल (हिं.स.)पिंपरी शहराला उन्हाळ्याच्या तोंडावर पाण्याची तीव्र गरज असताना महापालिकेचे दोन महत्त्वाचे पाणीप्रकल्प अजूनही रखडल्याचे चित्र आहे. तातडीने पाणी मिळावे म्हणून भामा-आसखेड जलवाहिनीच्या ठेकेदाराला बदलण्याची वेळ प्रशासनावर आली, तर दुसरीकडे राज्य शासनाचा ग्रीन सिग्नल मिळालेल्या पवना बंदिस्त जलवाहिनीबाबत अजून एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

शहराच्या वाढत्या लोकसंख्येला आणि नव्याने समाविष्ट भागांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी भामा-आसखेड हा पर्यायी प्रकल्प वर्षानुवर्षे महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, कामातील दिरंगाई, ठेकेदाराची मंदगती आणि सततच्या विलंबामुळे अखेर हा प्रकल्प ठेकेदार बदलण्याच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. याहून गंभीर बाब म्हणजे शहराच्या दीर्घकालीन पाणी सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा असलेला पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प शासनाने तत्त्वतः मंजूर करूनही महापालिकेकडून पुढे एकही ठोस पाऊल पडलेले नाही. मंजुरीनंतर समन्वय बैठक, मार्ग आखणी, अंमलबजावणीचा आराखडा किंवा स्थानिक पातळीवरील संवाद यापैकी एकही प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू नसल्याने हा प्रकल्प पुन्हा फक्त कागदावरच राहणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande