
पुणे, 08 एप्रिल, (हिं.स.) - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) महत्त्वाकांक्षी इनर रिंगरोड प्रकल्पाला आता वेग आला आहे. त्यासाठी ११ गावांतील १२० हेक्टर जमिनींची संयुक्त मोजणी पूर्ण झाली असून जमिनींचे भरपाई दर निश्चित केले आहेत.
या प्रकल्पातील सोळू ते वडगाव शिंदे या पहिल्या टप्प्यातील भूसंपदनासाठी पीएमआरडीएने ११३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण, मोजमाप व भरपाईचा अहवाल तयार करून तो पीएमआरडीएकडे सादर केला.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर आणि आसपासच्या भागातील वाहतूक कोंडीचा त्रास कमी व्हावा, यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यात उड्डाणपूल, रेल्वे उड्डाणपूल, भुयारी मार्ग तसेच मोठे पूल उभारण्याची तरतूद आहे.
------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु