छ. संभाजीनगर - जिल्हा युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित
छत्रपती संभाजीनगर, 08 एप्रिल (हिं.स.)। चार वर्षांपासून जिल्हा क्रीडा पुरस्कार रखडले होते. जिल्हा युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. वर्ष २०२२-२३ ते २०२५-२६ या चार वर्षांसाठी पात्र युवक, युवती आणि संस्थांकडून अर्ज मा
छ. संभाजीनगर - जिल्हा युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित


छत्रपती संभाजीनगर, 08 एप्रिल (हिं.स.)। चार वर्षांपासून जिल्हा क्रीडा पुरस्कार रखडले होते. जिल्हा युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. वर्ष २०२२-२३ ते २०२५-२६ या चार वर्षांसाठी पात्र युवक, युवती आणि संस्थांकडून अर्ज मागवण्यात आले.

राज्याचे युवा धोरण २०१२ अंतर्गत खेळाडू आणि समाजहितासाठी कार्य करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यासाठी जिल्हा स्तरावर दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. मात्र, काही वर्षांपासून ही प्रक्रिया रखडली. त्यामुळे अनेक पात्र खेळाडू आणि क्रीडा संस्था या सन्मानापासून वंचित राहिल्या होत्या. याबाबत सातत्याने नाराजी व्यक्त होत होती.

या पुरस्कारासाठी प्रत्येक वर्षासाठी एक युवक, एक युवती आणि एक नोंदणीकृत संस्था यांची निवड करण्यात येणार आहे. विजेत्या युवक आणि युवतींसाठी प्रत्येकी १० हजार रुपये, तर संस्थेला ५० हजार रुपये, गौरवपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयात अर्ज उपलब्ध आहेत. १७ एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करता येणार आहेत

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande